Akshata Chhatre
सध्या गरमीचे दिवस वाढले आहेत. फॅन किंवा एसीशिवाय राहणं मुश्किल झालंय. विचार करा अशा स्थितीत तुमच्या घरचा फॅन मोडला तर?
गरमीचा उकाडा सहन करणं सोपं नाही आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला फक्त ७० रुपयांत कसा फॅन दुरुस्त करून घ्यावा याचा फॉर्मुला सांगणार आहोत.
अनेकवेळा पंखा जुना झाल्यास त्याची स्पीड कमी होते आणि याचा उपाय म्हणून केवळ ७० रुपयांत तुम्ही काम करून घेऊ शकता.
पंखा खराब झाला तर अनेकवेळा आपण हजार, दोन हजार मोडून नवीन पंखा घेऊन येतो, मात्र एवढा खर्च करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या.
सगळ्यात आधी म्हणजे पंख्याच्या ब्लेड्स स्वच्छ करून घ्या. आधी सुक्या आणि नंतर ओल्या कपड्याने पंखा पुसून घ्या.
याने काहीच होत नसेल तर पंख्याचा कॅपेसिटर बदलून बघा.
नवीन कॅपेसिटरची किंमत संध्यारं ६० ते ७० रुपये असते आणि नवीन पंख्याची गरज वाटत नाही.