Mehrangarh Fort: साधूचा शाप, जिवंत बलिदान अन् 31 राण्यांचं सती जाणं...! मेहरानगढ किल्ल्याच्या 3 सर्वात भयंकर गोष्टी; काळजाचा ठोका चुकवणारा काळ

Manish Jadhav

मेहरानगढ किल्ला

मेहरानगढ किल्ल्याची स्थापना 1459 मध्ये मारवाडचे शासक राव जोधा यांनी केली. त्यांनी आपली राजधानी मंडोरवरुन येथे हलवली आणि एका उंच टेकडीवर या विशाल किल्ल्याची पायाभरणी केली.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

'चिरीयाटंक' टेकडी आणि शाप

हा किल्ला ज्या टेकडीवर आहे, तिला 'चिरीयाटंक' (पक्ष्यांची टेकडी) म्हटले जायचे. तिथे राहणाऱ्या 'चिरीयानाथ' नावाच्या साधूला तिथून हटवण्यात आल्यामुळे त्यांनी किल्ल्याला 'पाण्यासाठी तरसाल' असा शाप दिला होता, ज्याचा प्रभाव आजही जाणवतो.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

राजा राम मेघवाल यांचं बलिदान

साधूचा शाप निकामी करण्यासाठी आणि किल्ल्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी एका मानवी बलिदानाची गरज होती. त्यावेळी राजा राम मेघवाल नावाच्या व्यक्तीने स्वतःहून स्वेच्छेने किल्ल्याच्या पायात जिवंत गाडले जाण्याचे सर्वोच्च बलिदान दिले.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

नावामागील खास रहस्य

'मेहरानगढ' हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. 'मेहर' म्हणजे सूर्य आणि 'गढ' म्हणजे किल्ला. जोधपूरचे राठोड घराणे स्वतःला सूर्यवंशी मानत असल्यामुळे त्यांनी या किल्ल्याचे नाव सूर्याच्या नावावरुन 'मेहरानगढ' असे ठेवले.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

अभेद्य आणि अजस्त्र भिंती

हा किल्ला जमिनीपासून तब्बल 410 फूट उंच टेकडीवर वसलेला आहे. याच्या भिंती इतक्या अवाढव्य आणि मजबूत आहेत की, अनेक आक्रमणे होऊनही हा किल्ला कधीही शत्रूला जिंकता आला नाही.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

जयपूर सैन्यावरील विजयाची निशाणी

किल्ल्याला एकूण 7 दरवाजे (पोल) आहेत. त्यापैकी 'जय पोल' हा दरवाजा 1808 मध्ये जयपूरच्या सैन्याविरुद्ध मिळालेल्या विजयाच्या प्रीत्यर्थ बांधला गेला. या भिंतींवर आजही तोफेच्या गोळ्यांचे डाग इतिहासाची साक्ष देतात.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

सती प्रथेचे हृदयद्रावक ठसे

किल्ल्याच्या 'लोहा पोल' दरवाजावर मारवाडच्या राण्यांच्या हाताचे 31 ठसे कोरलेले आहेत. 1843 मध्ये महाराजा मानसिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांनी सती जाण्यापूर्वी हे हाताचे ठसे तिथे उमटवले होते.

Mehrangarh Fort | Dainik Gomantak

Amer Fort: अंधारात शिसमहल बनतो प्रकाशाचा महासागर, लाल दगड आणि पांढऱ्या संगमरवराचा अद्भुत नजरा; 400 हून अधिक वर्षांचा 'अंबर किल्ला'

आणखी बघा