Pramod Yadav
गोव्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत डिचोलीत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
राज्यात आज विविध ठिकाणी छत्रपती शिवरायांचे भव्य पुतळे स्थापन करण्यात आले.
डिचोलीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये वेशभूषा, किल्ला, रांगोळी, फुगडी यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
डिचोलीत काढलेल्या शोभा यात्रेत ढोल, ताशा आणि लेझीमच्या तालावर अनेकांनी ठेका धरला.
गोवा सरकार राज्य पातळीवर शिवजयंती उत्सव साजरा करते, यावर्षी देखील मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली.