गोमंतक ऑनलाईन टीम
अभिनेत्री श्रृती हासन सध्या बॉयफ्रेंड शांतनू हाजारिका याला डेट करत आहे.
शांतनू हा एक आर्टिस्ट असून हे कपल गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
अलीकडच्या काळात दोघांनी सीक्रेट लग्न केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.
पॅपराझींचा फेव्हरिट असलेल्या ओरी याने याबाबतची हिंट सोशल मीडियातून दिली होती.
इन्स्टाग्रामवर क्यु अँड ए सेशनमध्ये ओरीने एका उत्तरात श्रृती हासनचा पती म्हणून शांतनू हाजारिका याचा उल्लेख केला.
आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये ओरीला एकाला उत्तर देताना सांगितले की, माझ्यासोबत फोटो काढायला नकार देणारी आणि खूप अॅटिट्युड दाखवणारी सेलिब्रिटी म्हणजे श्रृती.
ओरीने म्हटले आहे की, कदातिच काहीतरी गैरसमज झाला असावा. श्रृती मला प्युन आणि स्पॉटबॉयही म्हणाली होती. पण मी श्रृतीच्या पतीला चांगला ओळखतो, असेही तो म्हणाला.