Sameer Amunekar
रिकाम्या पोटी औषध घेतल्याने अॅसिडिटी, जळजळ, उलट्या किंवा मळमळ यासारख्या समस्या होऊ शकतात. विशेषतः पचनसंस्था संवेदनशील असेल, तर त्रास वाढतो.
सतत रिकाम्या पोटी काही औषधं घेतल्याने पोटात अल्सर होण्याचा धोका वाढतो. काही पेनकिलर किंवा अँटीबायोटिक्स असे नुकसान करू शकतात.
भोजनाशिवाय घेतलेली काही औषधं योग्य प्रकारे शोषली जात नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होतो.
काही औषधं रिकाम्या पोटी घेतल्यास रक्तदाबात अचानक बदल होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येणे, थकवा यांसारखी लक्षणं दिसू शकतात.
सतत अशा पद्धतीने औषध घेतल्यास यकृत आणि किडनीवर ताण येऊ शकतो, कारण शरीरावर औषधांचं प्रमाणिक प्रमाणात काम होणे कठीण जाते.
काही औषधं अन्नासोबत घेतल्यास त्यांचे दुष्परिणाम कमी होतात, पण तीच औषधं रिकाम्या पोटी घेतल्यास साइड इफेक्ट्स जास्त होण्याची शक्यता असते.