Sameer Panditrao
वसंत ऋतूमध्ये होणाऱ्या भरतीमुळे समुद्र खूप दूरवर ओसरतो, ज्यामुळे बीचच्या काठावर मनसोक्त भटकता येते.
तेंव्हा खडकांच्या दरम्यान लपलेले सुंदर जलीय जीवन पाहण्याचा आनंद मिळतो.
भरतीच्या वेळी तळपोणा बीचला भेट दिलीत तर तुम्हाला जादूई अनुभव येईल.
तुम्ही इथल्या खडकांवर जाण्याचा विचार करत असाल, तर कृपया नाजूक प्राण्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.
सावध रहा आणि खडकांवर हात ठेवल्यास हलका ठेवा, कारण एखादी चुकीची हालचाल होउन, प्राणी चिरडले जाऊ शकतात.
खडकांच्या जवळील वाळूत पाय रुततो त्यामुळे तिथे फिरताना काळजी घ्या.
समुद्राकाठची वनसंपदा आपल्यामुळे खराब होऊ नये याची काळजी घ्या.