Pranali Kodre
आयसीसीने 5 जानेवारी रोजी अमेरिका आणि वेस्ट इंडिजला होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
हा वर्ल्डकप 1 जून ते 29 जून 2024 दरम्यान खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, कॅनडा, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज, अमेरिका, नामिबिया आणि युगांडा असे 20 संघ सहाभागी होणार आहेत.
या 20 संघांची साखळी फेरीसाठी चार गटात विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरीनंतर 19 जूनपासून सुपर-8 फेरी रंगेल. त्यानंतर 26 आणि 27 जून रोजी सेमीफायनल आणि 29 जून रोजी फायनल होईल.
साखळी फेरीसाठी भारतीय संघाचा समावेश ए गटात समावेश असून या गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका या संघांचाही समावेश आहे.
भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध होईल.
भारताचा साखळी फेरीतील तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध आणि 15 जून रोजी चौथा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे.
साखळी फेरीतील भारताचे सर्व सामने अमेरिकेत होणार आहेत. तसेच जर भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला, तर पुढील सामने खेळेल.