Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात दीडच दिवसात 4 जानेवारी 2024 रोजी 7 विकेट्सने विजय मिळवला.
तसेच त्यापूर्वी 26 ते 29 डिसेंबर 2023 दरम्यान सेंच्युरियनला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 डाव आणि 32 धावांनी विजय मिळलला होता.
त्यामुळे भारत - दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.
दरम्यान या मालिकेतील पहिल्या सामन्यात 287 चेंडूत 28 चौकारांसह 185 धावांची खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गारने सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता.
तसेच दुसऱ्या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात 15 धावांत 6 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 31 धावांत 1 विकेट अशा मिळून एकून 7 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार मिळाला.
तसेच मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिकावीर पुरस्कार विजेत्यांचीही नावे घोषित करण्यात आली. मालिकावीर पुरस्कार डीन एल्गार आणि जसप्रीत बुमराह यांना विभागून देण्यात आला.
एल्गारने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 3 डावात 67 च्या सरासरीने 201 धावा केल्या.
बुमराहने या मालिकेत 4 डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक 12 विकेट्स घेतल्या.