Amitabh Bachchan: बीग बी बनले टीम इंडियासाठी ‘’अश्वत्थामा’’

Manish Jadhav

T20 विश्वचषक 2024

यंदाचा T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमरिकेत होणार आहे. यासाठी सर्वच देश आपले संघ जाहीर करु लागले आहे. 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यातच, भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

T20 World Cup 2024 Trophy | Twitter

भारतीय संघ

T20 विश्वचषक 2024 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यातच बीग बी अमिताब बच्चन यांचा एका मेसेजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Team India | Dainik Gomantak

बीग बी

विश्वचषकापूर्वी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी या विश्वषचकात टीम इंडियाचा भाग असलेल्या या 15 खेळाडूंना खास मेसेज दिला आहे.

Amitabh Bachchan | Dainik Gomantak

बीग बींचा खास मेसेज

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘कल्की’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अश्वत्थामाच्या भूमिकेतूनच त्यांनी टीम इंडियाला खास मेसेज दिला आहे.

Amitabh Bachchan | Dainik Gomantak

बीग बी म्हणतायेत

व्हिडिओच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन म्हणत आहेत की, 'ये महायुद्ध है, अब हो जा तू तैयार। अब बन जा वीर, बुलंद कर अपनी तकदीर, दिखा दम, लगा दम।"

Amitabh Bachchan | Dainik Gomantak

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्यासोबत महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग देखील दिसत आहेत.

Amitabh Bachchan | Dainik Gomantak

'कल्की 2898 एडी' कधी रिलीज होणार?

अमिताभ बच्चन यांचा 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 27 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत. अमिताभच्या या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन, दिशा पटानी असे कलाकार दिसणार आहेत.

Amitabh Bachchan | Dainik Gomantak
PM Narendra Modi | Dainik Gomantak