Manish Jadhav
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावमधून काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसनं देशात केवळ तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देशातील ''राजे-महाराजांचा'' अपमान केल्याचा आरोप केला.
तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी त्यांनी नवाब, निजाम, सुलतान आणि सम्राटांनी केलेल्या अत्याचारांवर एक शब्दही उच्चारला नाही, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''त्यांनी (गांधी) राजे-महाराजांवर जनतेच्या आणि गरिबांच्या जमिनी आणि मालमत्ता हडप केल्याचा आरोप केला.
म्हैसूरच्या राजघराण्याच्या योगदानाचे स्मरण करुन मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या शहजाद्यानं जाणूनबुजून व्होट बँकेचं राजकारण आणि तुष्टीकरण लक्षात घेऊन असं वक्तव्य केलं.'
मोदी म्हणाले की, ''मतांसाठी काँग्रेस दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या बंदी घातलेल्या देशविरोधी संघटनेची मदत घेत आहे. केवळ वायनाडमध्ये जिंकण्यासाठी ते त्यांच्यापुढे गुडघे टेकत आहेत.