Virat Kohli: क्रिकेटच्या किंगने बॉलिवूडच्या किंगला टाकलं मागं; बनला नंबर-1 सेलिब्रिटी

Manish Jadhav

स्टार क्रिकेटर विराट कोहली

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. मात्र, यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आतापर्यंत त्याची कामगिरी काही खास राहिली नाही.

Virat Kohli | Dainik Gomantak

कोहलीकडून ‘विराट’ कामगिरीची अपेक्षा

चाहत्यांना आणि टीम इंडियाला आता सुपर-8 सामन्यांमध्ये कोहलीकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. यातच, विराटसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराटची मोठी झेप

सेलिब्रिटी ब्रँड वॅल्यूएशन रिपोर्टनुसार, विराटने ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी झेप घेतली आहे. यामध्ये त्याने किंग खानला (शाहरुख खान) मागे सोडले आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराटची ब्रँड व्हॅल्यू

सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये यावर्षी 28.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

2023 मध्ये ब्रँड व्हॅल्यू $227.9 दशलक्ष होती

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 मध्ये कोहलीची ब्रँड व्हॅल्यू $227.9 दशलक्ष होती.

Virat Kohli | Dainik Gomantak

2023 हे वर्ष विराट कोहलीसाठी खूप

2023 हे वर्ष विराट कोहलीसाठी खूप खास गेले. वर्ल्डकपमध्ये कोहलीने अनेक मोठे रेकॉर्ड मोडले.

Virat Kohli | Dainik Gomantak

‘ICC ODI Player of the Year 2023’ अवॉर्ड जिंकला

2023 मध्ये कोहलीने ICC ODI Player of the Year 2023 चा पुरस्कार जिंकला. तर याचवर्षी विराटने 126 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1050 कोटी रुपये कमावले.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट देशातील 2 सर्वात मोठा श्रीमंत खेळाडू

कोहली हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत खेळाडू आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू आता 1901 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

शाहरुख खान आणि रणवीर सिंगला मागे टाकले

विराट कोहली आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि शाहरुख खान यांच्याही पुढे गेला आहे. रणवीर सिंहचे गेल्या वर्षी ब्रँड व्हॅल्यू $ 203.1 दशलक्ष होती, तर शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू $ 120.7 दशलक्ष होती.

Virat Kohli | Dainik Gomantak