Manish Jadhav
आयसीसीने बुधवारी (19 जून) विश्वचषकादरम्यान अपडेटेड टी-20 रॅंकिंग जाहीर केली. या रॅंकिंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. सूर्यकुमार यादवने पुन्हा बाजी मारली.
T20 फलंदाजी क्रमवारीत टॉप-4 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव 837 रेटिंग गुणांसह पहिल्या, फिल सॉल्ट दुसऱ्या, बाबर आझम तिसऱ्या आणि मोहम्मद रिझवान चौथ्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार मार्कस स्टॉयनिस आता T20 क्रिकेटमध्ये नंबर 1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. स्टॉयनिसचे 231 रेटिंग गुण आहेत.
श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा (222 गुण) आता दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेशचा शाकिब अल हसन (218 गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.
स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. कोहली आणि रोहित प्रत्येकी दोन स्थानांनी घसरुन अनुक्रमे 50व्या आणि 51व्या स्थानावर पोहोचले आहेत.
भारताचा स्टार फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला दोन अंकाचा फटका बसला आहे. तो 9व्या स्थानावर पोहोचला आहे. तर वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेनने गोलंदाजी क्रमवारीत मोठी कामगिरी केली आहे.