Manish Jadhav
देशात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे लाखो लोक मरतात. यातच एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
'IQAIR' च्या रिपोर्टनुसार, जगातील 10 वायू प्रदूषित देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रिपोर्टनुसार, देशातील 83 शहरांमधील सर्वात खराब हवा आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या स्टेट ऑफ ग्लोबल एअरच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे 5 वर्षाखालील सुमारे 1.6 लाख मुलांचा मृत्यू झाला.
रिपोर्टनुसार, 2021 मध्ये संपूर्ण जगात वायू प्रदूषणामुळे 80 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. यामध्ये भारतातील 21 लाख आणि चीनमध्ये 23 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
ग्लोबल बर्डन ऑफ डिजीजवर आधारित अंदाजानुसार, दक्षिण आशियातील 5 वर्षांखालील मुलांमध्ये वायू प्रदूषण-संबंधित मृत्यू दर 100,000 प्रति 164 आहे, तर जागतिक सरासरी प्रति 100,000 मध्ये 108 आहे.
2021 मध्ये वायू प्रदूषणाने भारतीय मुलांना सर्वाधिक लक्ष्य केले आहे. 2021 मध्ये बालमृत्यूंमध्ये भारतात 169,400, नायजेरियामध्ये 114,100, पाकिस्तानमध्ये 31,100, इथिओपियामध्ये 31,100 आणि बांगलादेशमध्ये 19,100 यांचा समावेश आहे.