Sameer Amunekar
स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते.
स्विमिंग पूलसाठी खास तयार केलेला स्विमसूट घालणे गरजेचे आहे.
प्रत्येक पूलचे काही नियम असतात. उडी मारण्यास मनाई, खोल भागात जाण्यास बंदी, वगैरे. हे नियम तुमच्या सुरक्षेसाठीच असतात.
पोहायला जाण्याआधी शॉवर घेणे अत्यावश्यक असते. त्यामुळे शरीरावरील धूलिकण, घाम, तेल वगैरे स्विमिंग पूलमध्ये जाणार नाहीत.
लहान मुले एकटी पूलमध्ये सोडू नका. त्यांना सतत देखरेखीखाली ठेवा, शक्यतो फ्लोटर किंवा लाईफजॅकेट वापरा.
भोजनानंतर किंवा खूप दमल्यावर पोहणे टाळा. त्यामुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो.
काही लोकांना क्लोरीनचा त्रास होतो. डोळ्यांत जळजळ, त्वचेवर खाज येणे हे लक्षणे दिसल्यास त्वरित पाण्यातून बाहेर या.
डोळ्यांमध्ये पाण्यामुळे जळजळ होऊ शकते. केस ओले होण्यापासून वाचवण्यासाठी स्विमिंग कॅप वापरणे चांगले.