Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणमला पार पडला.
या सामन्यात भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवचा हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पहिलाच टी20 सामना होता. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची विजयी सुरुवात झाली आहे.
सूर्यकुमारने या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला.
सूर्यकुमारने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने 8 विकेट्स गमावत 19.5 षटकात पूर्ण केले.