सूर्यकुमार T20I मध्ये 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गला टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला.

India vs South Africa | X/BCCI

सूर्यकुमारचे शतक

या विजयात सूर्यकुमार यादवने शतक करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने विश्वविक्रमालाही गवसणी घातली.

Suryakumar Yadav | X/BCCI

चौथे शतक

सूर्यकुमारने 56 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. सूर्यकुमारचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील चौथे शतक ठरले.

Suryakumar Yadav | X/BCCI

विश्वविक्रम

दरम्यान, सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये चार वेगवेगळ्या देशात शतक करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर ठरला आहे.

Suryakumar Yadav

चार देशात शतक

सूर्यकुमारने इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका असे चार वेगवेगळ्या देशात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे.

Suryakumar Yadav

मॅक्सवेल आणि रोहित

दरम्यान, सूर्यकुमारव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा यांनीही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चार शतके ठोकली आहेत, पण त्यांनी ही चारही शतके चार वेगळ्या देशात ठोकलेली नाहीत.

Rohit Sharma - Glenn Maxwell | X/ICC

मॅक्सवेल आणि रोहितची शतके

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलने भारतात दोन शतके आणि ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेत प्रत्येकी एक शतक केले आहे. तसेच रोहितने तीन शतके भारतात आणि एक शतक इंग्लंडमध्ये केले आहे.

Rohit Sharma - Glenn Maxwell | X/ICC

सर्वाधिक शतके

दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार, मॅक्सवेल आणि रोहित यांच्या नावावर संयुक्तरित्या 4 शतके करण्याचा विश्वविक्रम आहे.

Suryakumar Yadav, Rohit Sharma, Glenn Maxwell | X/ICC

वाढदिवशी T20I क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलिंग करणारे क्रिकेटर

Kuldeep Yadav | X
आणखी बघण्यासाठी