Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गला टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला.
कुलदीप यादवने या सामन्यात 2.5 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 5 विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
विशेष म्हणजे 14 डिसेंबर रोजी कुलदीपचा 29 वा वाढदिवस देखील होती.
त्यामुळे कुलदीप पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वाढदिवशी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणारा गोलंदाज ठरला.
तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वाढदिवशी 5 विकेट्स घेणारा कुलदीप पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने कोलंबोमध्ये 2021 साली वाढदिवशी भारताविरुद्ध खेळताना 9 धावांत 4 विकेट्स घेतले होते. त्यामुळे वाढदिवशी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर आहे. त्याने 2014 साली वाढदिवशी चितगावला नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात 21 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
चौथ्या क्रमांकावर युएईचा कार्तिक मय्यपन असून त्याने 2021 साली वाढदिवशी दुबईमध्ये आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यांत 25 धावांच 5 विकेट्स घेतल्या होत्या.
एकाच दिवशी दोन महिला क्रिकेट अंपायरने रचला इतिहास