गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील 'परमपाई' हे ठिकाण आहे परफ़ेक्ट रोमँटिक प्लेस. सोबतच हे ठिकाण निसर्गाच्या विलोभनीय दृश्याने नटलेला एक सनसेट पॉईंट आहे.
नजर जाईल तिथेपर्यंत पाणी, सूर्याची किरणे, हिरवीगार झाडी आणि दूरवर दिसणारी टेकड्यांची रांग या ठिकाणाला स्पेशल बनवते.
तुम्ही डेटवरती जात असाल किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवू इच्छित असाल तर सूर्य मावळताना ही शांत जागा तुम्हाला स्वर्गासारखी सुंदर वाटेल.
नीरव शांतता आणि संध्याकाळी वाहणाऱ्या मंद वाऱ्यामुळे हे ठिकाण तुम्हाला आरामदायक वाटेल.
तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत परमपाई येथे पिकनिकचा आनंद घेऊ शकता. सोबत तुम्ही काही स्नॅक्स, कोल्ड्रिंक घ्या आणि मावळतीच्या किरणांसोबत छान वेळ घालवा.
सूर्य जसा क्षितिजापासून हळूहळू पाण्यात डुंबतो तसे इथल्या वातावरणात डुंबा आणि आपल्या जोडीदारासोबत हरवून जा.
सूर्य जसजसा मावळू लागतो तसे आकाशाकडे पाहा आणि ताऱ्यांच्या साक्षीने तुमचा दिवस अविस्मरणीय बनवा.
गजबजलेले किनारे विसरा आणि 'या' शांत बेटाची सैर करा!