गोमन्तक डिजिटल टीम
समुद्र किनारी पर्यटनासोबत गोव्यात अनेक सुंदर बेटे पाहण्यासारखी आहेत. आज आपण उत्तम पिकनिक स्पॉट असलेल्या या बेटाची सफर करू.
पाळोळे (Palolem) किनाऱ्याच्या खाडीत वसलेले हे बेट वृक्षसंपदेने नटलेले असल्यामुळे नेहमी हिरवेगार असते.
या बेटावर एकेकाळी माकडांचे वास्तव्य होते म्हणून या बेटाला मंकी आयलंड म्हणूनही ओळखले जाते.
या बेटाला कॅनाकोना बेट या नावानेही ओळखले जाते. याचा पृष्ठभाग जवळपास पाच एकरांचा आहे.
स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग हे वॉटर स्पोर्ट्स इथे खेळता येतात. या बेटाच्या परिसरात तुम्हाला डॉल्फिनही पाहायला मिळतात.
या विहंगम दृश्यांनी सजलेल्या बेटावर तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता. भरतीच्या वेळी मात्र स्थानिकांकडून माहिती घेऊनच पाण्यात जावा.
हे बेट अगोंदा किनाऱ्यापासून जवळ आहे. पाळोळे किनाऱ्यावरून फेरी बोटीतून आपण इथे जाऊ शकता.
ट्रेकप्रेंमींसाठी गोवा आहे परफेक्ट ठिकाण, 'इथे' करा भटकंती