IPL 2024: डेल स्टेनच्या जागेवर सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील झाला 'हा' दिग्गज

Pranali Kodre

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबाद संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामासाठी 4 मार्च रोजी नव्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

Sunrisers Hyderabad | X/IPL

नवा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक

आयपीएल 2024 हंगामात न्यूझीलंडचा माजी गोलंदाज जेम्स फ्रँकलिन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे.

James Franklin | X/DurhamCricket

डेल स्टेनची विश्रांती

डेल स्टेनने त्याच्या वैयक्तिक कारणामुळे आयपीएल 2024 हंगामातून विश्रांती घेतल्याने त्याच्या जागेवर फ्रँकलिनची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dale Steyn | X/SunRiseres

सामने

फ्रँकलिनने 31 कसोटी, 110 वनडे आणि 38 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये 2011 आणि 2012 च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

James Franklin | X/ICC

प्रशिक्षणाचा अनुभव

फ्रँकलिनला काउंटी क्रिकेटमध्ये आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

James Franklin | X/Middlesex_CCC

दुसरी मोठी घोषणा

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादची ही ४ मार्च रोजी केलेली दुसरी मोठी घोषणा आहे.

Sunrisers Hyderabad | X/IPL

नवा कर्णधार

4 मार्च रोजीच सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 साठी कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची नियुक्ती केली आहे.

Pat Cummins | ICC

...म्हणून गंभीरने केली राजकीय कर्तव्यातून मुक्त होण्याची विनंती

Gautam Gambhir | Dainik Gomantak