गोमन्तक डिजिटल टीम
या वर्षी सनबर्न फेस्टिवल दक्षिण गोव्यात करण्यासाठीची मागणी आयोजकांनी केली होती.
सनबर्न महोत्सवाला गोव्यातील विरोधी पक्षांनी तसेच स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
सनबर्न महोत्सव म्हणजे अश्लील नृत्य, अंमली पदार्थांचा व्यापार होत असल्याचे देखील आरोप करण्यात आले आहेत.
देशभरातील अनेक महाविद्यालयांमध्ये सनबर्नशी संबंधित संगीत महोत्सव आयोजित केले आहेत.
या वर्षी होणारा सनबर्न महोत्सव दक्षिण गोव्यात होणार की नाही, याबद्दल स्थानिक तसेच राजकीय पक्षांच्या विरोधामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
गोव्यातील होणारा सनबर्न महोत्सव हा प्रामुख्याने युवा वर्गासाठी मोठे आकर्षण असते. त्यामध्ये अनेक तरुण तरुणींचा सहभाग पाहायला मिळतो.