Sameer Amunekar
उन्हाळ्याच्या काळात उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि थंड हवामानाचा आनंद घेण्यासाठी भारतात अनेक सुंदर ठिकाणं आहेत.
हिमाचल प्रदेशातील मनाली हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून, उन्हाळ्यात येथे तापमान १०-२५ अंश सेल्सिअस दरम्यान असते. बर्फाच्छादित पर्वत, ब्यास नदी, आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
"द प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन" म्हणून ओळखले जाणारे कोडाईकनाल हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. धबधबे, तलाव, दाट झाडं आणि थंड हवामान यासाठी प्रसिद्ध.
रोहतांग खिंड, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वात थंड, साहसी आणि निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. उन्हाळ्यातही बर्फाचा अनुभव घेण्यासाठी हे एक उत्तम स्थान मानले जाते.
गुलमर्ग हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही येथे तापमान खूप कमी असते. हिरवीगार दऱ्या, स्नो स्पोर्ट्स आणि शांतता यासाठी हे उत्तम स्थान आहे.
डार्जिलिंग हे एक सुंदर हिल स्टेशन असून येथील चहा बागा, टॉय ट्रेन आणि हिमालयाचे नजारे पर्यटकांना भुरळ घालतात. उन्हाळ्यात येथील हवामान खूपच आल्हाददायक असते.