Sameer Amunekar
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सला ‘गुडबाय’ म्हणण्याची वेळ आली आहे. बाजारातील साखर आणि केमिकलयुक्त पेयांपेक्षा नैसर्गिक, शरीराला थंडावा देणारे पर्याय अधिक फायदेशीर ठरतात.
कैरीपासून बनवलेले पन्हं शरीराला थंडावा देते आणि उष्माघातापासून संरक्षण करते. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात.
पचनक्रियेस उत्तेजन देणारे आणि शरीराला थंड करणारे ताक उन्हाळ्यासाठी आदर्श आहे. थोडी जिरेपूड, मीठ घालून घेतल्यास चवही वाढते.
सोपं आणि उपयुक्त. लिंबूमध्ये ‘व्हिटॅमिन C’ भरपूर प्रमाणात असते. यामध्ये साखरेऐवजी मध किंवा थोडं मीठ घालून तुम्ही ते अधिक हेल्दी बनवू शकता.
कोकम थंड प्रकृतीचा असल्यामुळे त्याचे सरबत उष्णतेपासून आराम देते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी घटक काढून टाकायला मदत करतात.
या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. थंडावा देण्यासोबतच शरीरात हायड्रेशन टिकवून ठेवतात. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम घटकांशिवाय बनवलेले असल्यामुळे ते अधिक फायदेशीर ठरतात.