Best Summer Fruits: उन्हाळ्यात खा 'हे' दोन सुपरफ्रूट्स! कडक उन्हातही वाटेल थंडा थंडा कूल कूल

Manish Jadhav

नैसर्गिक थंडावा

उन्हाळ्यात कलिंगड आणि आंबा या दोन्ही फळांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि थंडावा मिळतो.

Watermelon and mango | Dainik Gomantak

पाण्याचे भरपूर प्रमाण

कलिंगडामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे घामावाटे शरीरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची कमतरता भरुन निघते.

Watermelon | Dainik Gomantak

जीवनसत्त्वांचा खजिना

आंब्यामध्ये विटामिन 'ए' आणि 'सी' मुबलक प्रमाणात असते, जे कडक उन्हात तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.

Mango | Dainik Gomantak

त्वचेचे रक्षण

या फळांमधील अँटी-ऑक्सिडंट्स सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात.

Watermelon and mango | Dainik Gomantak

पचनशक्ती सुधारते

आंब्यामध्ये असलेल्या फायबरमुळे उन्हाळ्यात होणारा अपचनाचा त्रास कमी होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

Mango | Dainik Gomantak

इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन

उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी कलिंगडातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची पातळी संतुलित ठेवतात.

Watermelon | Dainik Gomantak

उष्माघातापासून बचाव

नियमितपणे या फळांचा आहारात समावेश केल्यास 'सनस्ट्रोक' किंवा उष्माघाताचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

Watermelon and mango | Dainik Gomantak

झटपट ऊर्जा

उन्हामुळे गळून गेल्यासारखे वाटत असल्यास, आंब्यातील नैसर्गिक साखर शरीराला तात्काळ ऊर्जा देऊन ताजेतवाने करते.

Mango | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा