Akshata Chhatre
तुम्ही गोव्याला चाललाय, मात्र सध्या गोव्यातील वातावरण त्रास देणारं असू शकतं. गोव्यात सध्या प्रचंड गरमी आहे आणि याचा थेट परिणाम स्किनवर होतो.
गोव्याचं प्रमुख आकर्षण इथले समुद्र किनारे आहेत, मग वाढत्या उन्हामुळे किंवा गरमीमुळे समुद्र किनाऱ्यांवर जाणं बंद कराल का?
नक्कीच करू नका, त्यापेक्षा काही अशा गोष्टी करा जेणेकरून तुमच्या शरीराला त्रास होणार नाही आणि सुट्टीचा आनंद देखील मिळेल.
एकतर उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा. तुमच्या त्वचेला जी सनस्क्रीन ठीक असेल तिचा वापर करा. सनस्क्रीन शिवाय बाहेर पडणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
मान्य आहे तुम्ही किनाऱ्यावर जाताय पण लक्षात ठेवा तुमची त्वचा महत्वाची आहे, वाढतं उन्ह तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे असे कपडे वापरा ज्यामुळे तुम्हला गरमीचा जास्ती त्रास सहन करावा लागणार नाही.
भरपूर पाणी प्या. पाणी प्यायचं नसेल तर एखाद्या फळाचा ज्यूस तर नक्कीच प्या. कारण यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहायला मदत मिळते.