Sameer Amunekar
उन्हाळ्यात घामामुळे चेहऱ्यावर धूळ आणि तेल साचते, ज्यामुळे रोमछिद्रे बंद होऊन पिंपल्स येतात. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्याने त्वचा फ्रेश राहते.
घराबाहेर पडण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी ३० पेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन लावा. यामुळे सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे रक्षण होऊन टॅनिंग रोखण्यास मदत होते.
त्वचा आतून तजेलदार ठेवण्यासाठी दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. तसेच आहारात ताक, शहाळे आणि लिंबू पाण्याचा समावेश करा, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला फ्रेश कोरफडीचा गर लावा. कोरफड त्वचेला थंडावा देते, सनबर्न कमी करते आणि पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
टॅनिंग घालवण्यासाठी काकडीचा रस किंवा टोमॅटोचा गर चेहऱ्याला लावा. टोमॅटोमधील 'लायकोपीन' नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते, ज्यामुळे काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळतो.
उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्याने पिंपल्स येतात. त्यामुळे जास्त तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळा. त्याऐवजी ताजी फळे आणि पालेभाज्यांचे सेवन करा.
बाहेरून आल्यावर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर 'गुलाब पाणी' (Rose Water) लावा. हे एक उत्तम टोनर असून यामुळे त्वचेचा PH बॅलन्स राखला जातो आणि चेहऱ्याला त्वरित गारवा मिळतो.