Sameer Amunekar
सहसा धबधबे केवळ पावसाळ्यात पाहता येतात, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील 'धारेश्वर' हा असा दुर्मिळ धबधबा आहे जो बाराही महिने प्रवाहित असतो.
रणरणत्या उन्हातही या धबधब्याच्या जलधारा वाहत असल्याने, उन्हाळी सुट्टीत पर्यटकांसाठी हे एक उत्तम थंड हवेचे ठिकाण ठरते.
हा धबधबा प्रसिद्ध 'मार्लेश्वर' मंदिर परिसरात आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गुफा मंदिरामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
धबधब्याच्या अगदी समोर एक विशाल डोह आहे. या डोहाची अचूक खोली आजही कोणालाही मोजता आलेली नाही, हे इथले एक मोठे रहस्य मानले जाते.
हा परिसर घनदाट हिरव्यागार वनराईने वेढलेला आहे. डोंगराच्या रांगा आणि शांत वातावरणामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला प्रसन्नता मिळते.
रत्नागिरी जिल्ह्याच्या नैसर्गिक सौंदर्यात धारेश्वर धबधबा मोलाची भर घालतो. पावसाळा सुरू झाल्यावर येथील दृष्य अधिकच विलोभनीय होते.
बारामाही पाणी उपलब्ध असल्याने आणि सोयी-सुविधांमुळे सहलीसाठी, विशेषतः फॅमिली ट्रिपसाठी हे ठिकाण नेहमीच पसंतीस उतरते.