Sameer Amunekar
उन्हाळ्यात हवेतील धूळ आणि घाम छिद्रांमध्ये अडकतो, ज्यामुळे पिंपल्स येतात. दिवसातून किमान दोनदा सौम्य (Mild) फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. रात्री निजण्यापूर्वी चेहऱ्यावरील तेल आणि घाण काढणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि गुलाब पाणी त्वचेला थंडावा देते. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्याने पिंपल्सची सूज कमी होते आणि चेहरा फ्रेश दिसतो.
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. रात्री झोपताना शुद्ध कोरफड जेल चेहऱ्याला लावल्याने उन्हामुळे होणारी जळजळ थांबते आणि पिंपल्स हळूहळू सुकू लागतात.
जर पिंपल्समुळे चेहरा लाल झाला असेल किंवा दुखत असेल, तर एका सुती कापडात बर्फाचा तुकडा गुंडाळून पिंपल्सवर हलक्या हाताने दाबा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पिंपल्सचा आकार लहान होतो.
काकडीचा रस नॅचरल टोनर म्हणून काम करतो. काकडीचा रस आणि त्यात थोडे लिंबू टाकून चेहऱ्याला लावल्यास त्वचेचा पीएच (pH) लेव्हल संतुलित राहतो आणि पिंपल्स वाढणे थांबते.
त्वचा बाहेरून जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती आतून हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. आहारात टरबूज, संत्री आणि ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा.
उन्हात जाताना सनस्क्रीन लावणे टाळू नका, पण ते 'नॉन-कॉमिडोजेनिक' असावे. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होत नाहीत आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून पिंपल्सचे संरक्षण होते.