Sameer Amunekar
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी कोरफड जेल उत्तम पर्याय आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ताजे कोरफड जेल लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते.
कच्चे थंड दूध हे एक उत्तम नॅचरल क्लिंझर आहे. कापसाच्या मदतीने थंड दूध चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग (Tanning) दूर होते आणि चेहऱ्याचा रंग उजळतो.
काकडीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. काकडीचा रस किंवा तिच्या चकत्या चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्याला झटपट ताजेपणा मिळतो.
उन्हाळ्यात गुलाब पाणी नॅचरल टोनर म्हणून काम करते. दिवसातून २ ते ३ वेळा चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे मारल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
दोन चमचे दह्यात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे सनबर्नची समस्या दूर होऊन त्वचा मऊ होते.
वरचेवर उपाय करण्यासोबतच शरीर आतून हायड्रेट असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येईल.
आठवड्यातून दोनदा बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे कच्चे दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. हा पॅक वाळल्यानंतर हलक्या हाताने चोळून काढा; यामुळे डेड स्किन निघून जाईल.