स्वच्छ पाणी, निळाशार समुद्र अन् विस्तीर्ण किनारा! 'आरेवारे' बीचवर निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवा खरी शांतता!

Sameer Amunekar

कोकणातील लपलेलं रत्न

स्वच्छ पाणी, निळाशार समुद्र अन् विस्तीर्ण किनारा! गर्दीपासून दूर 'आरेवारे' बीचवर निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवा खरी शांतता!

Arey Ware beach Ratnagiri | Dainik Gomantak

निसर्गाचा नजराणा

हा सुंदर समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळ 'गणपतीपुळे'पासून हा बीच अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे.

Arey Ware beach Ratnagiri | Dainik Gomantak

रस्ता की जादूई सफर?

आरेवारे घाटातून प्रवास करताना एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र पाहून तुमचे मन हरखून जाईल! हा प्रवास थक्क करणारा आहे.

Arey Ware beach Ratnagiri | Dainik Gomantak

काचेसारखं स्वच्छ पाणी

व्यावसायिक गर्दी आणि प्रदूषणापासून दूर असल्यामुळे या किनाऱ्यावरील वाळू अत्यंत स्वच्छ आहे. येथील पाण्याचा निळाशार रंग मनाला सुकावून जातो.

Arey Ware beach Ratnagiri | Dainik Gomantak

धावपळीच्या आयुष्यातून सुटका

जर तुम्हाला कमर्शियल गर्दी नको असेल आणि फक्त समुद्राची गाज ऐकत शांतता अनुभवायची असेल, तर आरेवारे बीच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

Arey Ware beach Ratnagiri | Dainik Gomantak

कॅमेऱ्यात कैद करा आठवणी

येथील विस्तीर्ण किनारा, खडकाळ भाग आणि विहंगम सूर्यास्त यामुळे हा बीच फोटोग्राफी आणि रिल्स बनवण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

Arey Ware beach Ratnagiri | Dainik Gomantak

ब्युटी सिक्रेट! कोरफडीच्या सालीपासून तयार करा नैसर्गिक क्लींजर

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा