Akshata Chhatre
मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा आणतं, पण उन्हाळ्यात त्याची नीट काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मनी प्लांटला थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही. त्यामुळे त्याला थोडया सावलीत किंवा घरात कमी उजेडाच्या ठिकाणी ठेवा.
उन्हाळ्यात माती पटकन कोरडी होते. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा पाणी द्या, पण झाडाच्या मुळाशी पाणी साचू देऊ नका.
धूळ बसल्यास झाडाला श्वसनासाठी त्रास होऊ शकतो म्हणूनच पानं वेळोवेळी ओल्या कापडाने पुसा.
महिन्यातून एकदा केळ्याच्या साली, कॉफी ग्राउंड्स किंवा घरगुती खत वापरल्याने झाड ताजं राहतं.
मनी प्लांटवर वारंवार थोडं लक्ष द्या आणि काळजी घ्या, यामुळे त उन्हाळ्यातही फ्रेश आणि हिरवंगार राहील.