Akshata Chhatre
गोवा म्हणजे समुद्रकिनारे, निळा समुद्र पण उन्हाळ्यात जायचं का? चला पाहू फायदे आणि तोटे.
मार्च ते जून हा ऑफ-सीझन असतो. यामुळे बीचेवर फारशी गर्दी नसते. मनसोक्त वेळ घालवता येतो.
ऑफ-सीझनमुळे हॉटेल्स, फ्लाइट्स, आणि टूर पॅकेजेस स्वस्त मिळतात, म्हणजेच ही एक बजेट फ्रेंडली ट्रिप होते.
उन्हाळ्यात तापमान 35°C पेक्षा जास्त असते म्हणून अशावेळी सनस्क्रीन, हायड्रेशन आणि हलका पोशाख गरजेचा असतो.
जर उन्हामुळे बाहेर जाणं शक्य नसेल, तर स्पा, आयुर्वेदिक मसाज, कॅफे हॉपिंग यांचाही आनंद घेता येतो.
ऑफ-सीझनमध्ये वॉटर स्पोर्ट्स स्वस्त मिळतात, पण काही वेळा हे बंद असण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळ तपासून जा.