Sameer Amunekar
प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर बरेच फॅन्स असून ती जसा वेळ मिळेल तसा फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरं देत असते.
दरम्यान, एका पोस्टला उत्तर देताना प्रीति झिंटाचा तोल घसरला वादा. त्यामुळं वादाची ठिणगी पेटलीय.
प्रीति झिंटानं पोस्टला उत्तर देताना विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळं संतापाची लाट पसरलीय.
ट्रोल करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर विराट कोहलीचा फोटो होता. त्यावर प्रीति झिंटाने त्याला खडे बोल सुनावले आणि विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला.
"जो आपलं तोंड दाखवायच्या लायकीचा नाही तो विराट कोहलीच्या फोटोचा वापर करत आहे. त्याला कमेंट्स करण्याचा अधिकार नाही.’ त्यानंतर ट्रोलरने आपला फोटो बदलून कुत्र्याचा फोटो ठेवला. ट्रोलर्सला उत्तर देताना विराट कोहलीला मधे का आणलं? असा प्रश्न विराटचे चाहते विचारत आहेत.
प्रीतिने विराट कोहलीच्या चाहत्यांचा रोष पाहता आपलं स्पष्टीकरण दिलं. "मी विराटचा खूप आदर करते. त्या व्यक्तीनं ट्रोल करण्यापूर्वी विराटचा फोटो लावला होता. त्यामुळे मी असं बोलले."