Akshata Chhatre
गोव्यात सध्या बराच उकाडा वाढला आहे. दररोज त्रास देणाऱ्या या गर्मीशी कसे दोन हात करावेत या विचारात आहात का?
गोव्यात काही अशी सरबतं आहेत जी तुमची गर्मी क्षणार्धात दूर करतील.
सोलकढी म्हणजे गोवेकरांचा जीव-की-प्राण आहे. कोकमाच्या सालीपासून बनवलेल्या या कढीत नारळाचं दूध मिसळलं जातं.
अनेकवेळा या काळात गोव्याजवळ सगळ्यांची पावलं वळतात ती उर्राक पिण्यासाठी. उर्राक लिंबू सोडा, अडसराचं पाणी यांमध्ये मिसळून पिली जाते.
गोवा हा नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून इथे अडसराचं पाणी प्रसिद्ध आहे. अडसराचं पाणी आरोग्याला गुणकारी आहे.
कोकमचं पीक सुद्धा गोव्यात बऱ्याच प्रमाणात लागतं आणि म्हणून गोव्यात कोकम सरबत सुद्धा गर्मीवर रामबाण आहे.
फक्त गोव्यातच नाही तर ठिकठिकाणी गर्मीच्या दिवसांत लिंबू सरबत मोठ्या प्रमाणात पिलं जातं. यामुळे गर्मीचा त्रास कमी होतो.