Manish Jadhav
वाढत्या उष्णतेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. या समस्यांवर अनेक घरगुती उपाय आहेत. या घरगुती उपायांपैकीच एक नारळाचे तेल आहे.
पण जर तुम्ही त्वचेवर नारळाचे तेल लावत असाल तर हे तेल अशा पद्धतीने न लावल्यास त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुमची त्वचा तेलकट, संवेदनशील असेल तर नारळाचे तेल त्वचेला हानी पोहोचवू शकते.
नारळाचे तेल कॉमेडोजेनिक असते जे त्वचेचे छिद्र बंद करु शकते.
तेलकट किंवा मुरुमांची समस्या असलेल्या लोकांनी नारळ तेलाचा वापर योग्य पद्धतीने करावा.
संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर नारळाचे तेल लावताना खूप काळजी घेतली पाहिजे.
जर संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी नारळाचे तेल लावताना काळजी न घेतल्यास त्वचेवर पुरळ, सूज येऊ शकते.