Manish Jadhav
उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतूत तापमान जास्त असते ज्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता बळावते.
आज (25 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून उन्हाळ्यात मुलांना फिट ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुलांना जास्तीत-जास्त पाणी पिऊ घालावे.
उन्हाळ्यात ताज्या फळांचा ज्यूस मुलांना पिण्यासाठी द्यावा. फळांमध्ये पाणी आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात.
प्रखर सूर्यप्रकाशात मुलांना खेळण्यासाठी सोडणे त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्यावी. झाडाच्या सावलीत बैठे खेळ खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
उन्हाळ्यात मुलांना हलके आणि पचायला सोपे असे अन्न द्यावे. ताजे आणि हलके अन्न मुलांच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात मुलांना हलके आणि हवेशीर कपडे परिधान करण्यासाठी द्यावीत.