Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये बुधवारी (23 एप्रिल) मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार कामगिरी केली.
रोहितने या सामन्यात अर्धशतक झळकावून संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 70 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यामध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
रोहितने सनरायझर्सविरुद्ध अर्धशतक झळकावून टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटमध्ये जिंकलेल्या सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी कोणीही अशी कामगिरी करु शकले नाही.
रोहित 2008 पासून आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत त्याने 265 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 6856 धावा केल्या असून यामध्ये त्याने दोन शतके आणि 45 अर्धशतके झळकावली आहेत. तो आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना फलंदाजीमध्ये रोहित शर्मा आणि गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्टने केलेल्या कामगिरीच्या जोरावर जिंकला.
मुंबई इंडियन्सकडून रोहितने दमदार अर्धशतक झळकावले. तर सूर्याने 19 चेंडूत 40 धावा जोडल्या. तसेच, ट्रेंट बोल्टनेही शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.