Sameer Amunekar
उन्हात बाहेर पडताना केस थेट सूर्याच्या अतिनील (UV) किरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. सुती स्कार्फ किंवा हॅटचा वापर केल्याने केसांमधील ओलावा टिकून राहतो आणि केस कोरडे होत नाहीत.
घामामुळे डोक्याच्या त्वचेवर (Scalp) घाण जमा होते, ज्यामुळे कोंडा किंवा खाज येऊ शकते. सौम्य (Mild) शॅम्पूचा वापर करून आठवड्यातून किमान २-३ वेळा केस स्वच्छ धुवा.
उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे केस विस्कळीत होतात. केस धुवाल्यानंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावल्याने केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि ते मऊ राहतात.
उन्हाळ्यात केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. नेहमी साध्या किंवा थंड पाण्याने केस धुवा, जेणेकरून केसांची मुळे कमकुवत होणार नाहीत.
केसांना पोषण देण्यासाठी कोरफड कोरफड (Aloe Vera), दही किंवा खोबरेल तेलाचा वापर करून घरगुती हेअर मास्क आठवड्यातून एकदा नक्की लावा. यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा टिकतो.
उन्हाळ्यात आधीच वातावरणात उष्णता असते, अशा वेळी हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्नचा वापर टाळावा. केसांना नैसर्गिकरित्या वाळू द्या.
बाहेरून काळजी घेण्यासोबतच शरीराचे हायड्रेशन महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्या आणि आहारात ताजी फळे, पालेभाज्यांचा समावेश करा, ज्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या वाढीवर होतो.