Sameer Amunekar
उन्हाळ्यात व्यायामासाठी पहाटेची वेळ सर्वात आदर्श मानली जाते. यावेळी हवेत गारवा असतो आणि प्रदूषण कमी असते, ज्यामुळे फुफ्फुसांना शुद्ध हवा मिळते आणि शरीर लवकर थकत नाही.
जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल, तर सूर्यास्त झाल्यानंतर किमान तासाभराने व्यायाम करावा.
सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सूर्याची किरणे सर्वात प्रखर असतात. या काळात वर्कआऊट केल्याने 'हीट स्ट्रोक' (उष्माघात), चक्कर येणे किंवा प्रचंड डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो.
उन्हाळ्यात वर्कआऊट सुरू करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर थोडे-थोडे पाणी पीत राहा. साध्या पाण्यासोबतच लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाईट पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकून राहते.
जर तुम्ही जिममध्ये जात असाल, तर तिथे योग्य वेंटिलेशन किंवा एसी असल्याची खात्री करा. घराबाहेर व्यायाम करणार असाल, तर झाडांच्या सावलीत किंवा बागेत सराव करणे कधीही उत्तम.
वर्कआऊट करताना गडद रंगाचे किंवा जाड कपडे टाळा. घाम शोषून घेतील असे हलके आणि पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरा, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात व्यायामाचा अतिरेक करू नका. जर तुम्हाला खूप जास्त धाप लागत असेल, डोळ्यासमोर अंधारी येत असेल किंवा स्नायूंमध्ये पेटके येत असतील, तर लगेच वर्कआऊट थांबवून विश्रांती घ्या.