Akshata Chhatre
उन्हाळ्याच्या दिवसांत तुमच्या केसांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सुचवणार आहोत जे तुमच्या केसांना चमक आणि मजबुती देतील.
नारळ तेलातील पोषणद्रव्ये आणि लिंबातील व्हिटॅमिन C केसांची मुळे बळकट करतात, त्यामुळे कधीही नारळ तेल आणि लिंबू महत्वाचा.
लिंबातील अँटीबॅक्टेरियल घटक स्कॅल्प हेल्दी ठेवतो आणि केसगळती कमी होते. या मिश्रणामुळे केस चमकदार आणि मऊ होतात.
लिंबू आणि नारळ तेल केसांना सॉफ्ट आणि सिल्की बनवतात. हे केसांवर एका नैसर्गिक कंडिशनर प्रमाणे काम करतात.
नियमित मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केस लवकर वाढतात.
१ चमचा नारळ तेल + १ चमचा लिंबू, एकत्र करून ३० मिनिटं लावा, नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. आणि असं आठवड्यातून २ वेळा वापरल्याने केस वाढायला नक्कीच मदत होईल.