उन्हाळ्यात 'ग्लोइंग स्किन' हवीय? मग 'या' चुका टाळा आणि मिळवा आरशासारखी चमकणारी त्वचा!

Sameer Amunekar

सनस्क्रीन

उन्हाळ्यात सर्वात मोठी चूक म्हणजे सनस्क्रीन टाळणे. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी कमीत कमी SPF 30 असलेले सनस्क्रीन नक्की लावा.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

पुरेसे पाणी न पिणे

केवळ वरून क्रीम लावून त्वचा चमकत नाही. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतील.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

चेहरा वारंवार धुणे, स्क्रब करणे

घाम येतो म्हणून दिवसातून अनेकदा फेसवाश वापरणे किंवा जास्त स्क्रब करणे चुकीचे आहे. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा अधिक तेलकट किंवा कोरडी होऊ शकते.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

भरपूर मेकअप

उन्हाळ्यात जड मेकअप टाळलेलाच बरा. मेकअपमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे घाम बाहेर पडू शकत नाही आणि परिणामी पिंपल्स किंवा रॅशेस येतात. उन्हाळ्यात 'नो-मेकअप' लूक किंवा हलक्या उत्पादनांचा वापर करा.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे

उन्हाळ्यात पचनशक्तीवर परिणाम होतो. जास्त तेलकट, तिखट किंवा जंक फूड खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, ज्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर पिंपल्सच्या स्वरूपात दिसतो. त्याऐवजी ताजी फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

ओल्या त्वचेवर घाम पुसणे

घाम आल्यावर आपण अनेकदा रुमालाने जोरजोरात चेहरा पुसतो. यामुळे त्वचेवर घर्षण होऊन जळजळ किंवा रॅशेस येऊ शकतात. घाम पुसण्याऐवजी मऊ सुती रुमालाने हलक्या हाताने तो टॅप (Dab) करून टिपून घ्यावा.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ न करणे

दिवसभर त्वचेवर साचलेली धूळ, प्रदूषण आणि घाम रात्री तसाच राहिला तर पिंपल्स येणे निश्चित असते. त्यामुळे कितीही थकवा असला तरी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून हलके मॉइश्चरायझर लावल्याशिवाय झोपू नका.

How to get glowing skin in summer | Dainik Gomantak

उन्हाळ्यातील सर्वात हेल्दी फूड कोणते?

Cucumber | Dainik Gomantak
येथे क्लिक करा