Sameer Amunekar
दिवसभरातील घाम, सनस्क्रीन आणि प्रदूषण काढण्यासाठी चेहरा फक्त पाण्याने धुवून चालणार नाही. झोपण्यापूर्वी सौम्य क्लीन्सरने चेहरा स्वच्छ धुवा, जेणेकरून छिद्रे (Pores) मोकळी होतील.
उन्हाळ्यात त्वचा थंड ठेवण्यासाठी गुलाब पाणी उत्तम आहे. चेहरा धुवून झाल्यावर कापसाने गुलाब पाणी लावा किंवा चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचेचा PH बॅलन्स टिकून राहतो.
उन्हाळ्यात जड क्रीम्स लावण्याऐवजी वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर किंवा ताज्या कोरफडीचे जेल लावा. यामुळे त्वचा चिकट न होता हायड्रेटेड राहते.
उन्हामुळे आणि थकव्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. झोपण्यापूर्वी थोडे बदामाचे तेल किंवा आय-क्रीम लावून हलका मसाज करा.
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातील आर्द्रता कमी होते, त्यामुळे आतून हायड्रेशन मिळाल्यास सकाळी चेहरा टवटवीत दिसतो.
सुती उशीपेक्षा रेशमी उशी वापरा. यामुळे त्वचेवर घर्षण कमी होते आणि झोपेत त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
यालाच 'ब्युटी स्लीप' म्हणतात. रात्रभरात त्वचा स्वतःला रिपेअर करते. शांत आणि पुरेशी झोप घेतल्यास सकाळी चेहऱ्यावर थकवा न दिसता नैसर्गिक चमक दिसते.