Sameer Amunekar
कोरियन स्किनकेअरची सुरुवात 'डबल क्लिंजिंग'ने होते. पहिल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी ऑईल-बेस्ड क्लिंजर (उदा. खोबरेल तेल) आणि नंतर वॉटर-बेस्ड फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा. यामुळे छिद्रांमधील घाण पूर्णपणे निघून जाईल.
तांदूळ भिजवलेले पाणी फेकून न देता ते गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे पाणी नैसर्गिक टोनर म्हणून वापरा. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
त्वचा 'ग्लास' सारखी दिसण्यासाठी हायड्रेशन गरजेचे आहे. ताज्या कोरफड जेलमध्ये थोडे गुलाब पाणी मिसळून चेहऱ्याला मसाज करा. हे त्वचेला आतून ओलावा देते आणि चेहरा मऊ ठेवते.
तिसऱ्या दिवशी त्वचेवरील मृत पेशी (Dead Cells) काढण्यासाठी मध आणि पिठीसाखरेचा हलका स्क्रब वापरा. यामुळे त्वचा गुळगुळीत होऊन ती प्रकाश परावर्तित करू लागते, ज्याला आपण 'ग्लास स्किन' म्हणतो.
घरच्या घरी शीट मास्क बनवण्यासाठी पातळ सुती कापड तांदळाच्या पाण्यात किंवा ग्रीन टी मध्ये भिजवून १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यामुळे चौथ्या दिवसापर्यंत तुमच्या त्वचेतील ओलावा कमालीचा वाढेल.
पाचव्या दिवशी चेहऱ्याला वरच्या दिशेने बोटांनी मसाज करा. यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते आणि नैसर्गिक 'ग्लो' येतो. मसाजसाठी तुम्ही बदामाचे तेल किंवा जोजोबा ऑईल वापरू शकता.
बाहेरून उपाय करण्यासोबतच दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. आहारात फळांचा समावेश करा. अंतर्गत शुद्धीमुळेच चेहऱ्यावर खरी 'ग्लास स्किन' चमक दिसून येईल.