Sameer Amunekar
झाडांना दुपारी कडक उन्हात पाणी देणे टाळा. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी द्या, जेणेकरून मुळांना ओलावा शोषण्यास पुरेसा वेळ मिळेल.
कुंडीतील मातीवर वाळलेला पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या किंवा लाकडी भुसा यांचा थर द्या. यामुळे मातीतील ओलावा लवकर उडून जात नाही आणि मुळांना थंडावा मिळतो.
कुंड्या वेगवेगळ्या न ठेवता त्या एकमेकांच्या जवळ ठेवा. झाडांच्या समूहामुळे आर्द्रता (Humidity) टिकून राहते आणि झाडे लवकर सुकत नाहीत.
जर तुमची बाग गच्चीवर किंवा बाल्कनीत असेल, तर शक्य असल्यास 'ग्रीन नेट' लावा. यामुळे झाडांवर थेट पडणाऱ्या अतिनील किरणांची तीव्रता ५० टक्क्यांनी कमी होते.
खूपच नाजूक रोपे असतील, तर त्यांच्या कुंडीभोवती ओले गोणपाट किंवा सुती कापड गुंडाळा. हे नैसर्गिक कूलिंग सिस्टमप्रमाणे काम करते.
केवळ मुळांना पाणी न देता दिवसातून एकदा झाडांच्या पानांवर पाण्याने स्प्रे करा. यामुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि झाडं ताजीतवानी दिसतात.
उन्हाळ्यात झाडांना जास्त प्रमाणात रासायनिक खते देऊ नका. खतांमुळे मातीत उष्णता वाढू शकते, ज्यामुळे मुळे जळण्याची भीती असते. त्याऐवजी घरगुती सेंद्रिय खतांचा वापर करा.