Sameer Amunekar
दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्या. त्वचेला आतून ओलावा मिळाल्यास ती उन्हातही कोमेजलेली दिसत नाही.
ऑफिसला जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी किमान ३० किंवा त्यापेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन लावा. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.
ऑफिसवरून घरी आल्यावर चेहऱ्यावर ताक किंवा दही लावा. यामुळे चेहऱ्यावरील उष्णता कमी होऊन टॅनिंग झटपट निघून जाते.
काकडीचा रस किंवा काकडीच्या चकत्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर ठेवा. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि त्वचेला थंडावा मिळतो.
ऑफिसमध्ये असताना जेव्हा चेहरा थकलेला वाटेल, तेव्हा चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे (Face Mist) मारा. यामुळे त्वचा त्वरित टवटवीत होते.
आठवड्यातून दोनदा बेसन, चिमूटभर हळद आणि लिंबाचा रस एकत्र करून लावा. हा नैसर्गिक 'नॅचरल ग्लो' मिळवण्याचा उत्तम घरगुती मार्ग आहे.
जेवणामध्ये टरबूज, संत्री आणि ताजी फळे यांचा समावेश करा. हे फळे त्वचेला 'व्हिटॅमिन सी' देतात, ज्यामुळे नैसर्गिक चमक कायम राहते.