Summer Gardening Tips: उन्हामुळे झाडं सुकू लागलीत? करा 'हे' 7 सोपे उपाय, तुमची बाग राहील हिरवीगार!

Sameer Amunekar

पाणी देण्याची योग्य वेळ

झाडांना दुपारी कडक उन्हात कधीही पाणी घालू नका. सकाळी सूर्योदयापूर्वी (१० च्या आधी) किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर (६ नंतर) पाणी दिल्यास मुळांना थंडावा मिळतो आणि पाणी बाष्पीभवनामुळे उडून जात नाही.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

मल्चिंगचा वापर

कुंडीतील मातीवर वाळलेला पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या किंवा गवताचा थर द्या. यामुळे मातीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो आणि थेट उन्हामुळे मुळे जळत नाहीत.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

ग्रीन नेट किंवा सावलीची सोय

कडक दुपारच्या उन्हापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी 'ग्रीन नेट' (शेड नेट) वापरा. जर शक्य नसेल, तर नाजूक झाडे दुपारच्या वेळी सावलीत किंवा घराच्या आत हलवा.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

कुंड्यांचे गट करा

सर्व कुंड्या विखुरलेल्या न ठेवता एकमेकांच्या जवळ ठेवा. यामुळे झाडांच्या पानांमधून बाहेर पडणाऱ्या बाष्पामुळे तिथे एक आर्द्रतेचे (Humidity) वातावरण तयार होते आणि झाडे लवकर सुकत नाहीत.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

पाणी देण्याची 'डीप वॉटरिंग' पद्धत

वरवर थोडे पाणी न घालता कुंडीच्या खालच्या छिद्रातून पाणी बाहेर येईपर्यंत पाणी द्या. यामुळे पाणी तळातील मुळांपर्यंत पोहोचते आणि झाडाला पूर्णपणे हायड्रेशन मिळते.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

खतांचा अतिवापर टाळा

उन्हाळ्यात झाडांना जास्त गरम किंवा रासायनिक खते देणे टाळावे. उन्हामुळे झाड आधीच तणावात असते, अशा वेळी जड खतांमुळे झाड जळण्याची शक्यता असते. त्याऐवजी शेणखताचे पाणी किंवा ताक यांसारखी थंड खते वापरा.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

ट्रे किंवा डिश पद्धतीचा वापर

कुंडीच्या खाली एक छोटी पसरट डिश किंवा ट्रे ठेवा आणि त्यात थोडं पाणी भरून ठेवा. यामुळे उन्हाच्या तडाख्यात कुंडीतील माती खालून ओलावा शोषून घेते.

Summer Gardening Tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात कोरफड लावण्याची 'ही' पद्धत नक्की ट्राय करा

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा