Sameer Amunekar
दुपारच्या कडक उन्हात वर्कआउट करणे टाळा. सकाळी लवकर (७ च्या आत) किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर व्यायाम करणे आरोग्यासाठी उत्तम ठरते.
व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स राखण्यासाठी पाण्यात लिंबू सरबत किंवा ओआरएस (ORS) मिसळून पिणे फायदेशीर ठरते.
व्यायाम करताना गडद रंगाचे किंवा घट्ट कपडे टाळा. घाम शोषून घेतील असे फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे वापरा, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहील.
जास्त उकाडा असल्यास व्यायामाचा वेग किंवा तीव्रता (Intensity) थोडी कमी ठेवा. शरीरावर जास्त ताण दिल्यास 'हीट स्ट्रोक'चा धोका संभवतो.
व्यायाम करताना चक्कर येणे, मळमळणे किंवा खूप जास्त थकवा जाणवल्यास त्वरित वर्कआउट थांबवा आणि थंड ठिकाणी आराम करा. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त ओढताण करू नका.
व्यायाम संपल्याबरोबर लगेच थंड पाण्याने आंघोळ करू नका. शरीराचे तापमान सामान्य होण्यासाठी १५-२० मिनिटे विश्रांती घ्या आणि त्यानंतरच कोमट किंवा साध्या पाण्याने आंघोळ करा.
उन्हाळ्यात पचनाला हलका असा आहार घ्या. आहारात काकडी, टरबूज आणि ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळेल.