Manish Jadhav
उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, आणि थकवा... पण हेच दिवस तुमचं वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम ठरु शकतात, तेही फारसा व्यायाम न करता! खाली दिलेल्या या सोप्या उन्हाळी ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमचं वजन सहजपणे कमी करु शकता.
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी थंड पदार्थ – जसे की कोकम सरबत, लिंबू सरबत, आणि ताक हे उपयुक्त ठरतात. हे पदार्थ पचायला हलके असतात आणि शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतात.
शरीर हायड्रेट राहिलं तर मेटॅबॉलिझम सुधारतो. दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्या. तुम्ही डिटॉक्स वॉटर (लिंबू, आले, पुदिना, फळांचे तुकडे असलेले) सेवन करु शकता.
उन्हाळ्यात जड, तळलेले अन्न टाळा. त्याऐवजी फळे, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर आणि उकडलेले पदार्थ खा. हे पचनाला मदत करतात आणि शरीरात उष्णता निर्माण करत नाहीत.
घाम गाळणारे जिम वर्कआउट्स न करता तुम्ही घरीच योगा, प्राणायाम, आणि स्ट्रेचिंग करु शकता. हे वजन कमी करण्यास मदत करतात आणि मानसिक शांतताही देतात.
योग्य झोप ही वजन नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. उन्हाळ्यात थंड वातावरण निर्माण करुन (उदाहरणार्थ, एसी/फॅन, हलके कपडे) रात्रीची झोप चांगली होईल.