Akshata Chhatre
उन्हाळ्याचे तापमान वाढत असताना गरोदरपण सांभाळणे अधिक अवघड होते. पण काळजी करू नका. या ८ सोप्या उपायांनी तुम्ही थंड आणि आरामदायक राहू शकता.
गर्भावस्थेत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असते म्हणून दर दोन तासांनी पाणी, लिंबूपाणी किंवा नारळपाणी प्या.
ताज्या फळांचे रस, दही, ताक आणि सूप यांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो.
घरात शक्य तितके वेळा पंखा/एसी चालू ठेवून थंड वातावरण ठेवा. गरज असल्यास ओल्या टॉवेलचा वापर करा.
उन्हाळ्यात भरपूर झोप आणि विश्रांती आवश्यक असते. शरीराला जास्त ताण न देता वेळेवर विश्रांती घ्या.
उन्हाळ्यात सूज येणे अगदीच सामान्य आहे. त्यामुळे पाय उंचावर ठेवा आणि वेळोवेळी हालचाल करत जा.