Good Parenting: मुलांना सुधारण्याआधी स्वतःला सुधारा! पालकांच्या 'या' सवयी ठरणार मुलांच्या भविष्याचा पाया

Sameer Amunekar

स्क्रीन टाईमवर नियंत्रण

जर तुम्ही स्वतः तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त असाल, तर मुलेही तेच करणार. मुलांसोबत असताना मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याशी संवाद साधण्याची सवय लावा.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

रागावर ताबा मिळवा

मुलांच्या चुकांवर ओरडण्याऐवजी शांतपणे समजावून सांगा. तुम्ही कशा प्रकारे राग व्यक्त करता, यावरून मुले भावनांचे व्यवस्थापन (Emotional Management) शिकतात.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

आदर देण्याची सवय

तुम्ही घरातील मोठ्या माणसांशी किंवा इतरांशी ज्या आदराने वागता, तीच वृत्ती मुले अंगीकारतात. 'आदर दिला तरच आदर मिळेल' हा धडा त्यांना तुमच्याकडून मिळतो.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

वाचनाची आवड जोपासा

मुलांनी पुस्तके वाचावीत असे वाटत असेल, तर आधी स्वतः हातात पुस्तक धरा. पालकांना वाचताना पाहून मुलांमध्ये नैसर्गिकरित्या कुतूहल आणि ज्ञानाची ओढ निर्माण होते.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

शिस्त आणि दिनचर्या

स्वतःचे काम वेळेवर करणे, टापटीप राहणे आणि व्यायामाची आवड असणे, या तुमच्या सवयी मुलांच्या शिस्तबद्ध आयुष्याचा पाया ठरतात.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

सकारात्मक दृष्टिकोन

संकटाच्या वेळी तुम्ही कसे वागता, यावर मुलांची मानसिक शक्ती अवलंबून असते. तुमची सकारात्मक विचारसरणी त्यांना आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यास शिकवते.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

चुका मान्य करण्याचे धाडस

जर तुमच्याकडून काही चूक झाली, तर मुलांसमोर ती मान्य करा आणि माफी मागा. यामुळे मुलांमध्ये प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होईल.

Parenting tips for child development | Dainik Gomantak

त्वचेसाठी 'वरदान' ठरेल तांदूळ-गुलाबाचा फेस पॅक

Rice Flour Rose Face Pack | Dainik Gomantak
येथे क्लिक करा